Belagavi

मतिमंद मुलांच्या आराधना शाळेत जागतिक दिव्यांग दिन

Share

बेळगावातील किल्ला येथील मतिमंद मुलांच्या आराधना शाळेत क्रांती महिला मंडळ व उमा संगीत प्रतिष्ठान, हिंदवाडी यांच्या वतीने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सेवानिवृत्त सैनिक दोड्डप्पा हंजी यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करून बोलताना सांगितले की, मतिमंद मुलांसाठी या शाळेला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यासाठी आमची माजी सैनिक संघटना तयार आहे. क्रांती महिला मंडळ आणि उमा संगीत प्रतिष्ठानच्या वतीने अशा शाळेत मतिमंद मुलांसाठी जागतिक दिव्यांग दिनाचे आयोजन करण्यात आल्याचे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

निवृत्त सैनिक शिवानंद हिरेमठ, सिद्धरामप्पा रोट्टी, महेश कम्मार, चन्नाप्पा हलगीमरडी आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते ललिता गवस, मायव्वा सन्निंगनावरा, रिजवाना जमादार, श्रीकांत देसाई, बसप्पा सुनधोळी या दिव्यांग खेळाडूंचा यावेळी सत्कार करण्यात आला.
स्वागतपर भाषणात बसाप्पा सुनधोळी यांनी, या दोन्ही संस्थांच्या अध्यक्षा असलेल्या मंगला मठद यांच्या सामाजिक कळवळीबद्दल कृतज्ञता व्यक्त करून देव त्यांना अधिक सेवा करण्याची शक्ती देवो, असे ते सांगितले.

मंगला मठद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास आराधना शाळेचे मुख्याध्यापक गजानन सुतार यांची प्रमुख उपस्थिती होती.
रत्ना गुडगनट्टी, हेमा भरभर, रेणुका कांबळे, शोभा काडन्नावर, राजश्री बाळून्नावार, रत्नश्री गुडेर, विध्यार्थी व इतर उपस्थित होते.

Tags:

national-handicapped-day-celebration-from-kranti-mahila-mandal/