ळगाव ही राज्याची दुसरी राजधानी असली तरी ती विकास आणि संधींपासून वंचित आहे असा मुद्दा बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी आज विधानसभेत यांनी उपस्थित केला.
विधानसभेत आज प्रश्नोत्तराच्या सत्रात बोलताना आ. बेनके यांनी, बेळगाव शहराची दिवसेंदिवस वाढ होत असून, विविध जिल्ह्यातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असून त्यांना वसतिगृहात प्रवेश मिळत नसल्याची तक्रार केली. वसतिगृह प्रवेशाची संख्या वाढवण्याची मागणी त्यांनी समाजकल्याण मंत्री कोटा श्रीनिवास पुजारी यांच्याकडे केली.
यावर उत्तर देताना समाजकल्याण मंत्री कोटा श्रीनिवास पुजारी यांनी सांगितले की, वसतिगृहासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. पण 200 विद्यार्थ्यांना याआधीच प्राधान्याने राहण्याची सोय करण्यात आली आहे. पुढील आर्थिक वर्षात आणखी अनुदान देऊन उर्वरित विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची व्यवस्था करण्यात येईल.
एकंदर आ. अनिल बेनके यांनी विध्यार्थी वसतिगृह प्रवेशाची समस्या सदनात मांडली आहे. त्यावर सरकार दिलेले वचन पाळणार का हे बघावे लागेल.


Recent Comments