Belagavi

कोविडकडे राजकारण म्हणून पाहू नका : यू. टी. खादर

Share

भारतीय जनता पक्षाच्या सरकारने कोविडचे ढोंग करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू नये, कोविडकडे राजकारण म्हणून पाहू नका अशी सूचना माजी आरोग्यमंत्री यू. टी. खादर यांनी बेळगावात केली.

सुवर्णसौधमध्ये मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना यू. टी. खादर म्हणाले, कोविडवरुन सरकार जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहे. तुमच्या वक्तव्याने लोकांना काळजी वाटते, मीडियामध्ये जे काही येते ते खरे असे समजू नये, असे त्यांनी सांगितले. चीनमधील परिस्थितीचे सत्य जाणून घेऊन लोकांमध्ये जागृती निर्माण करावी. सर्वात मोठी आपत्ती कोणत्या देशात घडली आहे, संसर्गाने किती मृत्यू झाले याची माहिती सरकारने जाहीर करावी. हिवाळ्यात काही साथी येतात आणि जातात, त्यांचा बाऊ करणे कितपत ठीक आहे अशा शब्दांत त्यांनी सरकारला फटकारले.

एकंदर, कोविडवरून सरकारने राज्यातील जनतेमध्ये विनाकारण संभ्रम करू नये असा सल्ला खादर यांनी सरकारला दिला आहे.

Tags:

dont-see-covid-in-politically-u-t-khadar/