Belagavi

पुन्हा सेवेची संधी मिळण्याचे कारण तुमचे प्रेम आहे : प्रादेशिक आयुक्त महांतेश हिरेमठ

Share

बेळगाव हा माझा मातृ जिल्हा आहे. इथेच खेळलो आणि मोठा झालो . जिल्हाधिकारी म्हणून माझ्या सेवेत तुम्ही मला दिलेले सहकार्य आणि प्रेम मी कधीही विसरणार नाही.

बेळगाव विभागाचे नूतन प्रादेशिक आयुक्त महांतेश हिरेमठ म्हणाले की, येथे पुन्हा सेवेचे भाग्य लाभले याचे कारण तुम्हा सर्वांचे प्रेम आणि विश्वास आहे. सोमवारी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी शहरातील विविध संघटनांकडून सत्कार स्वीकारून आपले मनोगत व्यक्त केले . मी जिल्हाधिकारी असताना संपूर्ण जिल्ह्यातील जनता, लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनातील कर्मचारी, अधिकारी यांच्या सहकार्याने सर्व समस्या सक्षमपणे हाताळू शकलो. माझ्या सेवेच्या कालावधीत मला येथे पारदर्शक सेवा सेवा देण्याचा बहुमान दिल्याबद्दल त्यांनी सर्व संस्थांचे आभार मानले.

वन्यजीव, पर्यावरण विकास मंचाचे अध्यक्ष सुरेश उरबीनहट्टी, सरचिटणीस डॉ. डी.एन.मिसाळे, उपाध्यक्ष, श्रीशैल मठद , खजिनदार जगदीश मठद , संघटक सचिव प्रा. मारुती कदम, संचालक प्रा. शिवशंकर अब्बाई, मल्लेश रोट्टी, महेश माविनकट्टी, आणि जंगम समाजाचे नेते विरुपक्षया नीरलगीमठ, एन. बी.निर्वाणी, अशोक गोवेकर, स्नेह समाज सेवा संघाचे बसवराज गौडप्पगोला, महेश चिटगी, हालभावी , स्नेह बलगचे सोमशेखरैया हिरेमठ, रामतीर्थनगर येथील सुरेश यादव फाऊंडेशनचे अध्यक्ष विक्रम जाधव, सुरेश यादव यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

Tags:

mg-hiremath-has-accepted-charge-as-the-regional-commissioner-of-belgaum-division/