Belagavi

विधिमंडळ अधिवेशनात आमदार, मंत्र्यांकडून कोविड नियमांचे पालन

Share

विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या सप्ताहाला आज प्रारंभ झाला. यावेळी सुवर्णसौधमध्ये सर्व आमदार आणि मंत्रीगण कोविड नियमांचे पालन करत सुवर्णसौधमध्ये प्रवेश करते झाले.

कोविडच्या नव्या व्हेरिएंटमुळे जगभरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सुवर्णसौधमध्ये उच्चस्तरीय बैठकही झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज सुवर्णसौधमध्ये येणाऱ्या अधिकारी, आमदार आणि मंत्र्यांना आरोग्य विभागाकडून कोविड नियमांचे पालन करून प्रवेश देण्यात आला. आरोग्य विभागाचे अधिकारी अधिवेशनात येणाऱ्या अधिकाऱ्यांना स्क्रीनिंग टेस्ट, सॅनिटायझर आणि मान्यवरांना मास्क देताना दिसून आले.

विधानसभेचे अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे-कागेरी, आमदार अभय पाटील, लक्ष्मी हेब्बाळकर, चन्नराज हट्टीहोळी आदी लोकप्रतिनिधींना आरोग्य अधिकाऱ्यांनी कोविड नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.

Tags:

minister-who-entered-suvarnasoudha-for-covid-rule-policy/