Belagavi

राज्यात मोठा मोलॅसिस घोटाळा : बी. के. हरिप्रसाद

Share

राज्यात मोलॅसिस घोटाळा झाल्याचा आरोप करून ज्येष्ठ काँग्रेस नेते बी. के. हरिप्रसाद यांनी सी. टी. रवी यांच्यावर निशाणा साधला.

सुवर्णसौधमध्ये आज प्रसारमाध्यमांशी बोलताना बी. के. हरिप्रसाद यांनी भाजपचे सी. टी. रवी यांच्यावर निशाणा साधला. रवी माझ्याविरोधात नको नको ते बोलत आहेत. भ्रष्टाचाराविरोधात आम्ही चर्चेसाठी तयार केलेली कागदपत्रे सभागृहात मांडणार आहोत. राज्यात मोलॅसिस घोटाळा झाला आहे. गोव्यातून महाराष्ट्रात तीन लाख टन मोलॅसिस पाठवण्यात आला आहे. यात मोठा घोटाळा झाला आहे. तो आम्ही उघडकीस आणू. सी. टी. रवी यांनी मला, बायकाना विकणारे, खुनी म्हटले आहे. बीएसवाय असताना दारू बंद झाली होती, हजारो लोक रस्त्यावर आले. आता त्यांचा बायकांवर डोळा आहे, बायकांच्या माध्यमातून 24 हजार कोटी येणार आहेत. गुजरात मॉडेलवर मद्यपानावर बंदी घालून हा घोटाळा करणाऱ्यांनी दुसऱ्याला खुनी म्हणणे योग्य नाही असा टोला त्यांनी हाणला.

सी. टी. रवी यांना एळ्ळ अमावस्येला दारू आणि बाई मिळाली नाही, म्हणून ते गावठी हातभट्टीची पिऊन नशेत बोलले आहेत. माझी पार्श्वभूमी संपूर्ण देशाला माहीत आहे. हे लहान असताना मी चिक्कमंगळूरमध्ये इंदिरा गांधींची निवडणूक पाहिली होती. देशात त्यांचेच सरकार आहे, माझ्यावर एकजरी एफआयआर दाखवून दिला तर मी राजकारण सोडेन, त्यांच्याविरोधात किती एफआयआर आहेत ते ही बघा. आमदार झाल्यावर त्यांनी किती पैसे केलाय ते बघा. गोमांस विक्रेत्यांकडून किती हप्ते घेतले, हातभट्टी चालकांना प्रोत्साहन दिले. आमदार होताच एवढे पैसे कमावणे शक्य नाही. माझीही मालमत्ता बघा अन त्यांचीही बघा असे खुले आव्हान बी.के. हरिप्रसाद यांनी दिले. एकेकाळी सी. टी. रवीला चिक्कमगळुरहून बंगळुरूला यायचे झाल्यास त्याला कोणाकडून तरी लिफ्ट घ्यावी लागत होती, पण आता ऐशारामी कारमधून प्रवास करतो अशी टीका त्यांनी केली.

Tags: