Belagavi

जनार्दन रेड्डीना मंत्री श्री रामुलू यांच्या शुभेच्छा

Share

जनार्दन रेड्डी यांनी स्थापन केलेल्या नूतन पक्षासाठी ऑल द बेस्ट, असे रेड्डी यांचे निकटवर्तीय मंत्री श्री रामुलू म्हणाले .

ते आज सुवर्ण सौध येथे माध्यमांशी बोलत होते. रेड्डी हा अतिशय हुशार माणूस आहे. त्यांनी अनुभवाच्या जोरावर पक्ष काढला आहे, तो चांगला चालावा अशी मी प्रार्थना करतो.रेड्डी यांना भाजपमध्ये ठेवण्यासाठी वरिष्ठांशी बोललो आहे आणि गरज पडली तर आजही बोलेन.

मी रेड्डी यांचा चांगला मित्र आहे त्यामुळे मी त्यांना शुभेच्छा देतो. भाजपने 150 जागा जिंकल्या पाहिजेत, आमचा पक्ष राष्ट्रीय पक्ष आहोत आमचे स्वतःचे कार्यकर्ते आहेत . त्यांनी पक्ष काढला तर ते चांगले की वाईट यावर चर्चा करणार नाही. पण मला माझ्या पक्षावर लक्ष केंद्रित करावे लागेल.

Tags: