बेळगाव तालुक्यातील शिंदोळी गावात क्षुल्लक कारणावरून दोन युवकांचा डबल मर्डर झाल्याची घटना घडली. या दुहेरी हत्याकांडाने लोक हादरले आहेत.
बसवराज बेळगावकर आणि गिरीश नागण्णावर अशी खून झालेल्या युवकांची नावे असून ते दोघेही 22 वर्षांचे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदोळी गावात सध्या फ्लड लाईट क्रिकेट्स्पर्धा सुरु आहेत. काल रात्री 10.45च्या सुमारास गावातील शासकीय शाळेच्या मैदानात युवक क्रिकेट खेळत असताना अचानक एक वाहन शेतात घुसले. त्याला युवकांनी आक्षेप घेतल्याने चिडलेल्या चालकाने वाहनातून खाली उतरून दोन्ही तरुणांवर चाकूने वार केले. गंभीर जखमी अवस्थेत दोन्ही युवकांना तातडीने बीम्स सरकारी इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र अतिरक्तस्रावाने बसवराज याचा वाटेतच मृत्यू झाला तर गिरीशचा इस्पितळात उपचारांचा उपयोग न होता मृत्यू झाला.

घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. डीसीपी रवींद्र गडादी आणि एसीपी नारायण बरमणी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गावात राखीव पोलिसांची तुकडी तैनात करण्यात आली आहे.


Recent Comments