कर्नाटक राज्य बणजीग समाज विकास संघाच्या बेळगाव तालुका शाखेच्या वतीने , 15 व्या वधुवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते .
समाजातील तरुण तरुणींना त्यांच्या शिक्षण आणि पदानुसार योग्य आणि मनपसंद जोडीदार मिळावा यासाठी ,कर्नाटक राज्य बणजीग समाज विकास संघाच्या बेळगाव तालुका शाखेच्या वतीने, रविवारी , विद्याधिराज सभागृहामध्ये , वधुवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते .
समाजातील डॉक्टर , इंजिनीयर , एमबीए आणि उच्चस्तरीय शिक्षण घेऊन , लग्नासाठी इच्छुक असलेल्या वधूवरांना योग्य स्थळ मिळावे हा यामागचा हेतू होता .
या वधुवर मेळाव्यामध्ये 100 जणांनी नोंदणी केली . कर्नाटक राज्य बणजीग समाज विकास संघाच्या बेळगाव तालुका शाखेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन हिडदुग्गी यांनी या वधुवर सूचक मेळाव्याची माहिती दिली .
यावेळी समाजसेविका सरला हेरेकर तसेच नोंदणीसाठी आलेल्या तरुण तरुणी आणि त्यांचे पालक उपस्थित होते .


Recent Comments