Belagavi

अग्नीवीर वायू सैनिकाच्या पहिल्या बॅचचे बेळगावमध्ये प्रशिक्षण

Share

बेळगावचे सांबरा एअरमन ट्रेनिंग स्कुल , अग्नीवीर वायू सैनिकांच्या पहिल्या बॅचला प्रशिक्षण देण्यासाठी सज्ज झाले आहे. प्रशिक्षणाच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण झाली असून , आज रविवारी , अग्नीवीर वायू च्या प्रशिक्षणार्थी उमेदवार या एअरमन ट्रेनिंग स्कूल मध्ये दाखल झाले .

केंद्र सरकराने अलीकडेच अग्नीवीर ही युवकांसाठी विशेष योजना अमलात आणली आहे . या योजनेंतर्गत निवड झालेले उमेदवार प्रशिक्षणासाठी , बेळगावमधील सांबारा एअरमन स्कुल मध्ये दाखल झाले आहेत . त्यांची पूर्ण सुरक्षा तपासणी करून , त्यांची कागदपत्रे तपासून त्यांना दाखल करून घेण्यात आले . देशभरातील विविध राज्यातील २८५० अग्नीवीर वायू प्रशिक्षणार्थी जवान ह्या ट्रेनिंग स्कूल मध्ये दाखल झाले आहे .

अनेक वर्षांपासून बेळगावमधील एअरमन ट्रेनिंग स्कुल , देशासाठी वायुसैनिक घडवत आहेत . आपल्या देशातील हे प्रमुख एअरमन ट्रेनिंग स्कुल असून हवीये दलात याचे मोठे योगदान आहे . या ठिकाणी प्रशिक्षण घेतलेले वायुसैनिक उच्चपदावर जात आहेत . अग्नीवर वायूसैनिक शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या स्वास्थपूर्ण ठेवण्यासाठी इथले प्रशिक्षक सज्ज झाले आहेत . या सर्वांच्या निवास आणि भोजनाची सोय करण्यात आली आहे . 25 डिसेंबर ते 29 डिसेंबर पर्यंत हे प्राथमिक प्रशिक्षण चालणार आहे .

यासंदर्भात एअरफोर्स स्टेशनचे प्रमुख , एस श्रीधर यांनी सांगितले कि, आम्ही अग्नीवर वायू जुनं तरबेज करीत आहोत . 6 महिने प्रशिक्षण कालावधीत , त्यांना पूर्ण प्रशिक्षित करून त्यांना एअरफोर्सच्या अन्य शाखेत प्रशिक्षणासाठी पाठवणार आहोत .

बेळगावच्या मातीत , सांबारा एअरमन ट्रेनिंग स्कुलमध्ये अग्नीवर वायूच्या पहिल्या बॅचला प्रशिक्षण देण्यात येतेय ही समस्त बेळगावकरांसाठी अभिमानाची बाब आहे .

Tags: