बेळगावमधील फोर्ट रोड वरील कामत गल्ली कॉर्नर येथील एका दुकानातील बॅटरीचा स्फोट होऊन या आगीत दोन टायर शॉप, बॅटरी शॉप, ट्रान्सपोर्ट शॉप, टूल्स दुकान यांसह सहा हून अधिक दुकाने जळून खाक झाली.
दुकानांना आग लागल्याने आग विझवण्यासाठी बारा अग्निशमन बंबांचा वापर करण्यात आला.दुकानांच्या शेजारी तीस हून अधिक घरे असून, कामत गल्लीतील घरांमध्येही आग पसरण्याची भीती व्यक्त होत होती. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले .

घटनास्थळी बेळगाव दक्षिणचे आ . अनिल बेनके यांनी भेट देऊन , परिस्थितीची पाहणी केली . अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले असून उद्या पंचनामा करून , नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले .
30 हून अधिक जवान आग विझवत होते . . दोन डीसीपी आणि शंभरहून अधिक पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आहे.मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.


Recent Comments