येत्या सोमवारी 27 डिसेंबर रोजी बेळगावातील नेहरूनगरमधील कन्नड भवनमधील रंगमंदिराचे उद्घाटन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी दिली.

बेळगावात शनिवारी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. प्रभाकर कोरे म्हणाले, मंगळवारी सायंकाळी पाच वाजता कन्नड भवन रंगमंदिराचे उद्घाटन होणार आहे. गदग येथील तोंटदार्य जगद्गुरू श्री सिद्धराम स्वामीजी कार्यक्रमाचा दिव्य अभिषेक करतील. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, ऊर्जा मंत्री सुनील कुमार, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी, आमदार अनिल बेनके, अभय पाटील आणि चित्रपट कलाकार गिरिजा लोकेश प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
यावेळी केएलईचे संचालक महांतेश कवटगीमठ आदी उपस्थित होते.


Recent Comments