Belagavi

ग्रंथालय पर्यवेक्षकांना किमान वेतन लागू करावे

Share

ग्रंथालय पर्यवेक्षकांना किमान वेतन लागू करावे, या मागणीसाठी ग्रामपंचायत ग्रंथपाल व पर्यवेक्षक संघटनेच्या सदस्यांनी गुरुवारी सुवर्ण सौधासमोर ठिय्या आंदोलन केले.

राज्याच्या ग्रामीण भागातील ग्रामपंचायत ग्रंथपाल वर्षानुवर्षे ग्रामीण जनतेची व विद्यार्थ्यांची उपयुक्त पद्धतीने सेवा करत आहेत. नि:स्वार्थ सेवा देणाऱ्या ग्रंथपालांना किमान वेतन लागू करावे, तसेच त्यांना सेवेत कायम करावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.


ग्रंथपालांसाठी सेवा सुरक्षा, वृत्तपत्रांचे बिल वाढवणे आणि शहरातील ग्रंथालयांसारखी सर्व वर्तमानपत्रे आणि मासिके प्रदान करणे. सफाई कामगारांच्या भत्त्यात वाढ करण्याची मागणी आंदोलकांनी सरकारकडे केली.

आंदोलनात रमेश पांडव, मारुती डोळे, मारुती मल्लवगोला, सदानंद पुजारी (स्वामी) आदी सहभागी झाले होते.

Tags: