पतंग महोत्सव , बालचित्रकला स्पर्धा , होलीमिलन यासारखे जनतेला आनंद देणारे उत्साहवर्धक कार्यक्रम देणारे बेळगाव दक्षिणचे आ . अभय पाटील यांनी ग्रामीण खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी बालपणीच्या खेळांचे आयोजन केले होते .
गुरुवारी सकाळी , बेळगावमधील लेले मैदानावर आमदार अभय पाटील यांनी लहानपणीच्या खेळांचे आयोजन केले होते . विटीदांडू , गोट्या , तयार फिरवणे , भोवरा फिरवणे , कप्पी ,कबड्डी ,खोखो , दोरीउड्या , यासारख्या खेळांचे साहित्य उपलब्ध करून हे सर्व खेळ जनतेला उपलब्ध करून दिले होते . ग्रामीण भागात अजूनही हे खेळ खेळले जातात . मात्र काळाच्या ओघात हे खेळ मागे पडत चाललेले दिसून येतात . मात्र आ . अभय पाटील यांनी , आ . गोळीहट्टी चंद्रशेखर , आ .सिद्धू सवदी. आ . विश्वनाथ यांच्या नेतृत्वाखाली विविध ग्रामीण खेळांचे आयोजन करण्यात आले होते . या सर्व आमदारांनी टायर फिरवण्यासहीत , विटी दांडू ,भोवरा फिरवून , लहानपणीचे खेळ पुन्हा आवडीने खेळून पुन्हा एकदा आपल्या बालपणाचा आनंद लुटला . (फ्लो )
आ. सिद्धू सवदी यांनी लहानपणी खेळ खेळून आनंद व्यक्त केलं . हे जुने खेळ , चांगले आरोग्य आणि बौद्धिक विकास राखण्यास सक्षम आहेत . अशा खेळणं प्रोत्साहन देण्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यानी सांगितले .

आ . विश्वनाथ यांनी देखील या खेळाचा मनमुराद आनंद लुटून भोवरा फिरवण्यासहीत , विटीदांडूचा खेळ देखील खेळला . यावेळी त्यांनी अभय पाटील यांच्यामुळे या वयात देखील ह्या लहानपणीचे खेळ खेळायला मिळाले , आजच्या मुलांना हे मैदानी खेळ खेळायला मिळत नाहीत . मोबाईलवरील गेम आणि हे ग्रामीण खेळ यात खूप फरक असल्याचे ते म्हणाले . (बाईट )
या खेळाचे आयोजन करणारे आ .अभय पाटील म्हणाले कि गेल्या सात वर्षांपासून आम्ही बेळगावमध्ये या खेळाचे आयोजन करीत आहोत . कोरोनामुळे हे शक्य झाले नाही , ह्या ग्रामीण खेळांना प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले .

लहान मुलांसह , महिलांनीदेखील विविध खेळ खेळून , आपल्या बाळपापणीच्या आठवणींना उजाळा दिला .


Recent Comments