Belagavi

देशपांडे स्टार्टअप आयोजित साहित्य प्रदर्शन आणि विक्रीचा शुभारंभ : ग्राहकवर्गाचा उत्तम प्रतिसाद

Share

देशपांडे स्टार्टअप यांच्यातर्फे आयोजित साहित्य प्रदर्शन आणि विक्रीचा शुभारंभ थाटात पार पडला . ख्रिसमस आणि मकर संक्रांतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या प्रदर्शनाला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे .

देशपांडे स्टार्टअप यांच्यातर्फे बेळगावमधील रेल्वे ओव्हरब्रीज येथील मराठा मंदिर मध्ये , विविध साहित्याचे प्रदर्शन आणि विक्रीला प्रारंभ झाला . एकाच छताखाली मेगा उद्यम प्रदर्शनात विविध साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे . हस्तकलेच्या वस्तू हे या प्रदर्शनाचे खास आकर्षण आहे . शिवाय सोन्याचांदीचे दागिने ,कपडे , गृहसजावटीच्या वस्तू , विविध खाद्यपदार्थ , इलेक्ट्रॉनिक वस्तू , मातीच्या वस्तू तसेच विविध रोपांचे प्रदर्शन आणि विक्री करण्यात येत आहे . शिवाय महिलांसाठी साड्या , दागिने आणि सौंदर्य प्रसाधने देखील या ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत .

या प्रदर्शनाविषयी माहिती देताना आयोजन ईरय्या हिरेमठ यांनी सांगितले कि , ख्रिसमस आणि मकर संक्रांतीच्या निमित्ताने , बेळगाव वासियांना एकाच छताखाली सर्व काही खरेदी करता यावे या उद्देशाने , हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे . येथे सर्व प्रकारचे स्टॉलस उपलब्ध करून देण्यात आले असल्याने ग्राहक देखील खुश आहेत . अगदी खाद्यपदार्थांपासून , इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे स्टॉल्स असल्याने , ग्राहकांचे या प्रदर्शनाबाबतचे आकर्षण वाढेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली .

या प्रदर्शनात आपल्या वस्तूंचे स्टॉल्स लावलेल्या स्टॉल्सधारकांनी आयोजकांनी उपलब्ध करून दिलेल्या सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले . शहराच्या मध्यवर्ती भागात हे प्रदर्शन असल्याने ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे . आयोजकांनी आम्हाला चांगली व्यवस्था करून दिली आहे . असे ते म्हणाले .

हे प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी देखील इथल्या स्टॉल्सबद्दल पसंती दर्शवली . गृह सजावटीच्या वस्तूंसोबतच ,पर्यावरण प्रेमी नागरिकांसाठी विविध जातीची रोपटी ठेवण्यात आली आहेत . त्यामुळे बागकामाची आवड असलेले ग्राहक आपली आवडीची रोपटी खरेदी करीत आहेत . शिवाय महिलांचा जिव्हाळ्याचा विषय साड्या ,दागिने आणि सौंदर्य प्रसाधने खरेदीवर जास्त भर दिला जात आहे .

शनिवार दिनांक 24 डिसेंबर पर्यंत हे प्रदर्शन सकाळी 10 .30 ते रात्री 9 या वेळेत खुले राहणार आहे . बेळगावकरांनी ह्या प्रदर्शनाला भेट देऊन , लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे .

Tags: