Belagavi

इंडियन कराटे क्लब बेळगावच्या दोन विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट प्रदान

Share

हिंदवाडी येथील हिंद सहकारी संस्थेच्या सभागृहात कराटे बेल्ट चाचणी घेण्यात आली. या परीक्षेत एकूण 70 कलर बेल्ट कराटे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. दोन ब्लॅक बेल्ट विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला .

भारतीय कराटे क्लब व बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र काकतीकर यांनी , ओंकार कवेठि यांचा ब्लॅक बेल्ट, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला.तसेच नताशा राजू अष्टेकर हिला ब्लॅक बेल्ट प्रथम डॅन पदवी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच ओंकाराचे आई-वडील राहुल कवेठि आणि हीरा कवेठि यांचाही शाल व पुष्पहार देऊन गौरव करण्यात आला. या विद्यार्थ्यांना त्यांचे प्रशिक्षक प्रभाकर किल्लेकर यांच्याकडून प्रशिक्षण दिले जात आहे.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय कराटे क्लबच्या प्रशिक्षक हेमलता जी काकतीकर , विठ्ठल भोजगार , परशुराम काकती, विजय सुतार, निलेश गुरखा, हरीश सोनार, विनायक दंडकर, पूजा पाटील, साहिल दड्डीकर, दीपक चंदगडकर यांनी परिश्रम घेतले.

Tags: