Vijayapura

मुख्यमंत्री तुम्हाला सन्मान हवा की घेराव? विद्याराणी तुंगळ

Share

पंचमसाली समाजाला २ अ आरक्षण द्यावे अशी मागणी विजापूर जिल्हा काँग्रेस महिला युनिटच्या अध्यक्षा विद्याराणी तुंगळ यांनी केली .

विजापूर शहरात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना विद्याराणी तुंगळ यांनी सांगितले कि , बेळगाव अधिवेशनात पंचमसाली समाजाला आरक्षण जाहीर करावे. अन्यथा राणी चन्नम्मा गटातील 15 हजार महिलांसह सरकारविरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला. अहवाल यापूर्वीच आणला असून, मागणी पूर्ण होईल, अशी आशा आहे. मागणी पूर्ण न झाल्यास 22 डिसेंबरला अधिवेशन काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी महानगरपालिकेचे सदस्य प्रेमानंद बिरादार म्हणाले की, आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ, कूडलसंगमचे जयमृत्युंजय स्वामीजी , माजी आमदार विजयानंद कशप्पमवर आरक्षणासाठी लढा देत आहेत. समाजाच्या उत्कर्षासाठी हा संघर्ष आहे. यात पक्षीय संघर्ष नाही. पंचमसाली समाजाच्या आरक्षणासाठी हा संघर्ष असल्याचे ते म्हणाले.

पंचमसली समाजाला २ ए मध्ये आरक्षण न दिल्यास , विजापूर जिल्हा महिला काँग्रेस विभागाकडून 22 डिसेंबरला अधिवेशन काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे .

Tags:

vidyarani-tungal/