Belagavi

डीकेशींवरील छापे अन भाजपचा काहीच संबंध नाही : आर. अशोक

Share

केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या शैक्षणिक संस्थांवर सीबीआयने टाकलेल्या छाप्याशी भाजपचा काहीही संबंध नाही असे स्पष्टीकरण महसूल मंत्री आर अशोक यांनी दिले.

सुवर्णसौध येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना महसूल मंत्री आर अशोक यांनी, काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांच्या शिक्षण संस्थांवरील सीबीआय छाप्यांबाबत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते बी. के. हरिप्रसाद यांनी केलेले आरोप चुकीचे व तथ्यहीन आहेत. सीबीआय छापे आणि भाजपचा काहीही संबंध नाही. यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवरही सीबीआयने छापे टाकले होते. आता काँग्रेस नेत्यांवर छापे पडले असतील. पण हरिप्रसाद यांनी असे चुकीचे वक्तव्य करू नये, सीबीआय ही कायद्यानुसार काम करणारी स्वतंत्र एजन्सी आहे असे ते म्हणाले.

Tags: