Belagavi

अटक केलेल्या समिती नेत्यांची करा सुटका : शिनोळीत मराठी भाषिकांचे ठिय्या आंदोलन

Share

कर्नाटक अधिवेशनाला विरोध दर्शवण्यासाठी , महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने घेण्यात येणाऱ्या महामेळाव्याला परवानगी नाकारुन, समितीचे नेते आणि कार्यकर्त्यांना कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतले . या सर्वांच्या सुटकेसाठी , महाराष्ट्र कर्नाटकाच्या सीमेवरील शिनोळी येथे म . ए. समितीचे नेते तसेच महाराष्ट्राचे माजी राज्य मंत्री भरमूआण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले .

बेळगाव मध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याला परवानगी न दिल्याने आधीच मराठी भाषिक संतापले होते . त्यातच समिती नेते आणि कार्यकर्त्यांना कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतले . आपल्या नेत्यांच्या सुटकेसाठी , महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आणि चंदगड तालुक्याचे नेते माजी मंत्री भरमूआण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिनोळीत आंदोलन छेडण्यात आले .
बेळगाव , कारवार , निप्पाणी , बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ,बेळगाव आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे यासह कर्नाटक सरकारविरोधी घोषणा यावेळी देण्यात आल्या.

हे कार्यकर्ते रस्त्यावरच ठाण मांडून बसले होते . त्यामुळे शिनोळी ते बेळगाव रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती . आमच्या नेत्यांना सोडल्याखेरीज आम्ही इथून हलणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला .

या आंदोलनात एमईएस नेते सुरज कणबरकर , मदन बामणे , माजी तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते .

Tags:

shinnoli-mes-leaders-protest/