माजी मंत्री एच. के. पाटील यांच्याशी वैयक्तिकरित्या बोलून त्यांना काही तथ्ये आणि सत्य समजावून सांगेन असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.
चित्रदुर्ग येथे आज मुरुघा मठ परिसरातील हेलिपॅडवर उतरल्यानंतर कार्यक्रमाला जाण्यापूर्वी त्यांनी प्रसार माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली. एच. के. पाटील यांच्याशी वैयक्तिकरित्या बोलेन आणि त्यांना काही तथ्ये आणि सत्य समजावून सांगेन असे मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले. याचवेळी त्यांनी केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यासंदर्भात प्रश्नावर उत्तर देणे टाळले. बाईट
केंद्रीय गृहमंत्र्यांनी सीमावादावर बोलावलेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी भाग घ्यायला नको होता, या एच. के. पाटील यांच्या वक्तव्यावर त्यांनी वरीलप्रमाणे प्रतिक्रिया दिली.


Recent Comments