हानगल कुमारस्वामीजी यांच्या जीवनावर आधारित “विराटपुर विरागी” या चरित्रात्मक चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यासंदर्भात येत्या मंगळवारी सकाळी 9 वाजता लिंगराज महाविद्यालयात रथयात्रा आयोजित करण्यात आली आहे.
यासंदर्भात बेळगावात आज रविवारी पत्रकार परिषदेत माहिती देताना आनंद हावन्नावर यांनी सांगितले की, बेळगाव जिल्ह्यात हानगल कुमार स्वामीजी यांच्या चरित्रात्मक चित्रपट “विराटपुर विरागी” संदर्भात मंगळवार 20 डिसेंबर रोजी रथयात्रेचे आयोजन केले आहे. यावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते रथयात्रा आणि ध्वनिफितीचे अनावरण करण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, माजी एमएलसी महांतेश कवटगीमठ आणि इतर मान्यवर कार्यक्रमाला येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला सुजीत मुळगुंद, गुहेश अंटिन, सोमिलिंग माविनकट्टी आदी उपस्थित होते.


Recent Comments