कर्नाटक राज्य अक्कमहादेवी महिला विद्यापीठाचा 13वा आणि 14वा वार्षिक दीक्षांत समारंभ उद्या 19 डिसेंबर रोजी विद्यापीठाच्या ज्ञानशक्ती कॅम्पसमध्ये आयोजित केल्याची माहिती कुलगुरु प्रा. बी. के. तुलसीमाला यांनी दिली.
विजापुरात रविवारी पत्रकार परिषदेत बोलताना कुलगुरु प्रा. बी. के. तुलसीमाला यांनी सांगितले की, उद्या दुपारी 12 वाजता होणाऱ्या दीक्षांत समारंभाच्या कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलगुरू राज्यपाल थावरचंद गेहलोत, उच्च शिक्षण, आयटी आणि बीटी आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री अश्वत्थ नारायण सीएन, नवी दिल्ली जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू शांतीश्री धुलीपुडी पंडित सहभागी होणार असल्याचे कुलगुरु प्रा. बी. के. तुलसिमाला यांनी दिली. दीक्षांत समारंभात समाजसेविका डॉ. एस.जी. सुशीलम्मा, गुजरातमधील इंदुमती कटारे आणि श्रीमती रेश्मा कौर यांना विद्यापीठाचे कुलपती थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात येणार आहे. कर्नाटक राज्य अक्कमहादेवी महिला विद्यापीठातील विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवलेल्या एकूण 167 महिला विद्यार्थ्यांना 202 सुवर्णपदके प्रदान केली जात आहेत.
यातील 81 विद्यार्थिनींना 13व्या आणि 37 विद्यार्थिनींना 14व्या दीक्षांत समारंभात सुवर्णपदके मिळणार आहेत. या दीक्षांत समारंभात पदवी, पदव्युत्तर आणि पीजी डिप्लोमा अशा एकूण 23,911 महिला विद्यार्थी पदवीसाठी पात्र ठरल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. दीक्षांत समारंभात एकूण 55 विद्यार्थिनींना पीएच.डी.ची पदवी प्रदान करण्यात येणार आहे. एकूण 2,169 विद्यार्थिनींना विविध विषयांत पदवी प्रदान करण्यात येणार आहे. 13व्या दीक्षांत समारंभात एकूण 1,033 विद्यार्थिनींना स्नातकोत्तर पदवी प्रदान करण्यात येणार आहे. यापैकी एमए – 342, एम कॉम – 250, एमबीए-42, एमएससी -302, एमएड-11, एमपीएड-16, एमएलआयएस-10, एमएसडब्ल्यू-28, आणि एमसीए-16 विद्यार्थिनी पदवीसाठी पात्र असल्याची माहिती त्यांनी दिली. पत्रकार परिषदेला कुलसचिव प्रा. बी. एस. नावी, मूल्यमापन कुलसचिव प्रा. रमेश के., वित्त अधिकारी प्रा. एस. बी. कामशेट्टी, दीक्षांत समारंभ समन्वयक प्रा. नामदेवगौडा, माध्यम समिती अध्यक्ष प्रा. ओमकार काकडे आणि समन्वयक डॉ. तहमीना कोलार, आयसीटी समन्वयक संदीप नायक उपस्थित होते.


Recent Comments