Belagavi

सोमवारपासून विधिमंडळाचे अधिवेशन सुरू : सभापती मलकापुरे यांनी पुरेसा बंदोबस्त करण्याच्या दिल्या सूचना

Share

विधानसभेचे हिवाळी अधिवेशन 19 डिसेंबरपासून सुरू होत असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही पुरेसा बंदोबस्त ठेवावा, अशा सूचना विधान परिषदेचे सभापती रघुनाथराव मलकापुरे यांनी दिल्या.

सुवर्णसौधमध्ये आयोजित केलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. मंत्री, आमदारांसह कुणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. निवासाची कमतरता असल्यास त्वरित व्यवस्था करावी. ड्रायव्हर आणि मार्शल यांना पुरेसे जेवण दिले पाहिजे. आरोग्य सेवा आणि आपत्कालीन उपचारांसाठी आधीच सुविधा पुरविल्या जाव्यात आणि वैद्यकीय पथक नेहमी उपलब्ध असावे. मलकापुरे म्हणाले की, हे अधिवेशन पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना परिषदेकडून दरवर्षी पास दिले जातात.

जिल्हाधिकारी डॉ . नितेश पाटील यांनी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर निवास, भोजन, वाहतूक यासह विविध सुविधांची माहिती दिली. 20 हून अधिक पोलीस चौक्या स्थापन करण्यात आल्या आहेत, आंदोलन स्थळे निश्चित करण्यात त्याठिकाणी पिण्याचे पाणी आणि इतर पायाभूत सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. 61 आंदोलने करण्याची परवानगी मागितली आहे. संबंधित विभागाच्या मंत्र्यांच्या खासगी सचिवांच्या निदर्शनास आणून दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, कार्यक्रम पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना माहिती मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून केवळ सुवर्ण भवनात प्रवेश करण्यासाठी पासेस दिले जात आहेत, तर बाकीच्यांना विधानसभा व परिषदेकडून पास दिले जात आहेत.

यावेळी केवळ सरकारी वाहनांचा वापर केला जात आहे. मंत्री आणि उच्च अधिकारी बेंगळुरूहून त्यांची वाहने आणत आहेत त्यामुळे वाहतुकीला अडचण येणार नाही, असे ते म्हणाले.
विधान परिषद सचिव के.आर.महालक्ष्मी, जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Tags:

all-fecility-should-be-made-for-session-speaker-raghunathrao-malkapure/