Vijayapura

पीएसआयने शालेय विद्यार्थ्यांची बस दुरुस्त करून दाखवली माणुसकी

Share

ड्युटीवर असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याला रस्त्यावर मुलं बसलेली दिसली, तेव्हा त्याने त्या नादुरुस्त झालेल्या त्या मुलांच्या बसची दुरुस्ती करण्यासाठी एका मेकॅनिकला बोलावून आणले . आणि बस दुरुस्त झाल्यावर मुलांना सुखरूप घरी पाठवले .

गोकाक तालुक्यातील कोण्णूर येथील शांतीसागर शाळेचे विद्यार्थी एका दिवसाच्या शैक्षणिक सहलीसाठी करारानुसार गोकाक डेपोच्या बसमधून आले होते . अलमट्टी धरणाजवळ ह्या ट्रीपची बस रस्त्याच्या कडेला बंद पडली होती . दरम्यान, गस्तीसाठी आलेले निडगुंदी पोलीस स्थानकाचे पी,एस,आय, खाजू वालीलार यांनी स्वत: फोन करून दुरुस्तीसाठी मेकॅनिक ला बोलवून बस दुरुस्त करून घेतली . त्यानंतर विद्यार्थी व शिक्षक सुखरूप गोकाकला परतले . आणि ड्युटीवर असतानाही त्यांनी दाखवलेल्या माणुसकीबद्दल पोलीस अधिकाऱ्याचे मुलांनी आणि शिक्षकांनी आभार मानले .

Tags:

/vijayapura-psi-helped-to-repair-schoolbus/