Belagavi

हिवाळी अधिवेशनासाठी बेळगाव सज्ज : सुवर्णसौधमधील व्यवस्था देखील पूर्ण

Share

19 डिसेंबरपासून कर्नाटक सरकार बेळगावातील सुवर्ण सौध इमारतीत स्थलांतरित होत आहे. बेळगावच्या सुवर्ण विधानसौध मध्ये सोमवारपासून हिवाळी अधिवेशन होणार असून, त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे.

मंत्री, अधिकारी, विविध पक्षांचे नेते, प्रतिष्ठित व्यक्ती दहा दिवस बेळगाव शहरात वास्तव्यास असणार आहेत . त्यामुळे शहरातील रस्ते सुधारण्याचे काम सुरू असतानाच सुवर्ण विधानसौधला नवे रूप देण्याचे कामही जोरात सुरू आहे.

उत्तर कर्नाटकातील सत्ताकेंद्र असलेल्या सुवर्ण विधान सौधची स्वच्छता करून विद्युत रोषणाई करण्यात आली असून, मान्यवरांच्या विविध कार्यक्रमांसाठी इमारतीच्या प्रांगणात मंडप घालण्यात येत आहेत. इमारतीच्या अंगणातील कचरा साफ करून ते हिरवेगार करण्यासाठी शोभिवंत रोपे लावण्याचे कामही करण्यात आले आहे.
अधिवेशन काळात विविध मागण्यांसाठी विविध संघटना दहा दिवस निदर्शने, धरणे, मोर्चे काढणार असून, त्यांच्यासाठी बस्तवाडजवळील जागा निश्चित करण्यात आली असून तेथे तंबू उभारण्यात आले आहेत. आंदोलकांनी सुवर्णसौधच्या प्रांगणात प्रवेश करू नये यासाठी पद्धतशीरपणे बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.

एकूणच अधिवेशनासाठी येणारे अधिकारी, कर्मचारी, पोलीस, मान्यवर यांच्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व प्रकारची भोजन व निवासाची सर्व प्रकारची तयारी केली असून, अधिवेशन काळात कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी पूर्व व्यवस्था करण्यात आली आहे.

Tags: