कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात वकील संरक्षण कायदा मसुदा मंजूर करण्यात यावा या मागणीसाठी बेळगाव बार असोसिशनच्या वतीने , तीव्र आंदोलन छेडून , रास्ता रोको करण्यात आला . त्याचप्रमाणे , मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले .
कर्नाटकात वकील संरक्षण कायदा लागू करण्याची गेल्या कित्येक वर्षांची मागणी आहे . येत्या १९ डिसेंबर पासून बेळगावमध्ये सुरु होणाऱ्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात वकील संरक्षण कायदा मसुदा मंजूर करण्यात यावा यासाठी आज शुक्रवारी , बेळगाव बार असोसिएशनतर्फे आंदोलन छेडण्यात आले . बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड . प्रभू यतनट्टी , उपाध्यक्ष ऍड . सुधीर चव्हाण , ऍड . सचिन शिवण्णावर तसेच जेष्ठ वकिलांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला .व मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले .

यावेळी बेळगाव वकील संघाचे अध्यक्ष ऍड . प्रभू यतनट्टी यांनी सांगितले कि , वकील संरक्षण कायदा लागू करावा यासाठी आम्ही मागील कित्येक वर्षांपासून राज्यभरातील वकील आंदोलन करीत आहेत . वकिलांवरील हल्ल्यात वाढ झाली आहे . वकिलांवर अनेक लोक अन्याय करीत असतात . वकिलांनादेखील संरक्षण मिळाले पाहिजे . यासाठी वकील संरक्षण कायदा महत्वाचा आहे . मात्र सरकार या कायद्याची अंमलबाजवणी करायला तयार नाही .त्यामुळे बेळगाव येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात हा कायदा संमत करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली .
यावेळी बेळगाव बार असोसिएशनचे पदाधिकारी तसेच शेकडो वकील या आंदोलनात सहभागी झाले होते .


Recent Comments