बेळगावातील राणी पार्वतीदेवी कला व वाणिज्य महाविद्यालयाने आयोजित केलेल्या ‘आव्हान-2के22’ मध्ये गोमटेश हायस्कूलच्या विध्यार्थ्यानी विविध स्पर्धात यश मिळवून अजिंक्यपद पटकावले आहे.
टिळकवाडीतील आरपीडी महाविद्यालयात आयोजित आंतरशालेय ‘आव्हान-2के22’ स्पर्धा महोत्सवामध्ये गोमटेश विद्यापीठाच्या गोमटेश हायस्कूलच्या विध्यार्थ्यानी विविध स्पर्धांत चमकदार कामगिरी करून शाळेला अजिंक्यपद मिळवून दिले. यात डान्स स्पर्धेत अमुल्या वडगावीने द्वितीय पदक पटकावले.

फोटोग्राफीत भावेश रेवणकर प्रथम, 100 मी. धावणेत समर्थ माळवी तृतीय, थाळीफेकमध्ये केशव कांबळे प्रथम, प्रज्वल शेठ द्वितीय, शॉटपुटमध्ये बाळक्का पाटील प्रथम, मनुशा द्वितीय, मुलांच्या 4X100 मी रिलेत धीरज रेवणकर, प्रेम ठोंबरे, समर्थ माळवी, पूर्णानंद कमती, मुलींच्या 4X100 मी रिलेत मनुशा, बाळक्का पाटील, मरियम दुडगावी यांनी यश मिळवले. कबड्डी स्पर्धेत गोमटेशच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळवला.
या यशाबद्दल गोमटेश विद्यापीठाचे अधिष्ठाता संजय पाटील, संचालक राजेश पाटील तसेच मुख्याद्यापक, शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


Recent Comments