चोरी ,घरफोडी तसेच फसवणूक अशा विविध गुन्हे प्रकरणाचा बेळगाव जिल्हा पोलिसांनी छडा लावला आहे . सन 2022 मध्ये विविध प्रकरणांचा छडा लावून , कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त केला असून 324 आरोपीना अटक करण्यात आली आहे . अशी माहिती उत्तर विभागाचे आयजीपी सतीश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली .
शुक्रवारी , बेळगाव जिल्हा पोलीस विभागाच्या वतीने प्रॉपर्टी रिटर्न परेडचे आयोजन करण्यात आले होते . यासंबंधी पत्रकार परिषद घेऊन , उत्तर विभागाचे आयजीपी सतीश कुमार यांनी सन 2022 मध्ये , बेळगाव जिल्हा पोलिसांनी उलगडलेली प्रकरणे तसेच जप्त करण्यात आलेला मुद्देमाल याबद्दल माहिती दिली . यावेळी बेळगाव जिल्हा पोलिसांची त्यांनी प्रशंसा व्यक्त केली . बेळगाव जिल्हा पोलिसांनी उत्तम कामगिरी बजावली आहे . इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रकरणांचा छडा लावून त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला आहे . आधीचे पोलीस आणि आताचे पोलीस यामध्ये खूपच फरक आहे . बदलत्या तंत्रज्ञानानुसार , पोलिसांसमोर नवनवीन आव्हाने उभी ठाकत आहेत . विभागाकडून , पोलिसांनादेखील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देऊन त्यांना तरबेज करीत आहोत.

एका वर्षात पोलिसांनी 301 गुन्हे उघडकीस आणले असून 324 आरोपीना अटक करण्यात आली आहे . एकूण 17 कोटी 54 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . या प्रकरणांमध्ये 4 कोटी 18 लाख , किमतीचे आठ किलो 369 ग्रॅम सोने , 4 लाख 91 हजार किमतीची 7 किलो चांदी , 1 कोटी 24 लाख रु . किमतीच्या दुचाकी , 3 कोटी 99 लाख रु . किमतीची 24 मोटार वाहने जप्त करण्यात आली आहेत .त्याच प्रमाणे , 7 कोटी ४७ लाखांची रोकड , 59 लाख रु . किमतीचे मोबाईल व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे .
बेळगाव मधील डी आर मैदान येथे या जप्त केलेल्या मुद्देमालाचे पोलीस खात्याकडून प्रदर्शन भरवण्यात आले असून , मूळ मालकांना त्यांचे दागिने आणि वस्तू हस्तांतरित करण्यात येणार असल्याची माहिती एस पी संजीव पाटील यांनी दिली .
प्रत्येक पोलीस स्थानकानुसार त्यांनी जप्त केलेला मुद्देमाल प्रदर्शनात मांडण्यात आला होता. यानंतर मूळ मालकांना त्यांनी दिलेल्या पुराव्यानुसार त्यांचे दागिने आणि वस्तू हस्तांतरित करण्यात आल्या .

शिरगुप्पीच्या सुनीता बुवा नामक महिलेने सांगितले कि , त्यांच्या घरी ऑक्टोबर महिन्यात चोरी झाली होती . परंतु बेळगाव जिल्हा पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून आमच्या घरातून चोरीला गेलेल्याला सोन्याच्या वस्तू परत मिळवून दिल्या आहेत याबद्दल त्यांचे आभार मानते . त्याचप्रमाणे आपले सोन्याचांदीचे दागिने परत मिळालेल्या लोकांनी देखील पोलीस विभागाचे आभार मानले
यावेळी एएसपी महानिंग नंदगावी यांच्यासहित , विविध पोलीस स्थानकाचे सीपीआय , पीएसआय , तसेच पोलीस कर्मचारी आणि , तक्रारदार व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .


Recent Comments