कल्याण कर्नाटक रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या मुद्देबिहाळ परिवहन मंडळाचे कंडक्टर सी.आर. पट्टेपूर यांनी बसमध्ये अंदाजे 3 लाखांचे सोने असलेली बॅग विसरून गेलेल्या प्रवाशांना ती बॅग परत केल्याची घटना घडली आहे.
पट्टेपूर हे मुद्देबिहाळ -नालतवाड -नारायणपूर नॉन-स्टॉप बससाठी कंडक्टर म्हणून ड्युटीवर होते. सायंकाळी सहाच्या सुमारास मुद्देबिहाळ ते नालतवाडकडे निघालेली महिला प्रवाशी , अंगठी, बोरमाळ , चेन असे सोन्याचे दागिने असलेली बॅग सीटवर विसरली आणि खाली उतरली. सीटवरची बॅग पाहून पट्टेपुर यांना वाटले की कोणीतरी आपली बॅग विसरून गेले आहेत . त्यामुळे त्यांनी ती बॅग काळजीपूर्वक उचलून ठेवली .
बस पुन्हा मुद्देबिहाळ येथे आली असता बॅग विसरून गेलेली महिला आफरीन नायकोडी हिने तिच्या पतीसह येथील वाहतूक शाखेत धाव घेतली व बसमध्ये राहिलेली बॅग सापडली का याची चौकशी सुरू केली. त्याच्या चेहऱ्यावर भीती आणि चिंता दिसत होती. पट्टेपुर यांनी त्यांच्याकडे सापडलेली बॅग युनिटचे वाहतूक निरीक्षक यांच्याकडे सुपूर्द केली. हा प्रकार कळताच पट्टेपुर, या महिलेला व तिच्या पतीला युनिटच्या सुरक्षा रक्षक कक्षात घेऊन गेले आणि बॅगेत काय आहे, अशी विचारणा केली.
त्यानंतर त्याने ती पिशवी सर्वांच्या उपस्थितीत महिलेला दिली आणि त्यातील सोन्याचे दागिने शाबूत आहेत का, हे तपासण्यास सांगितले. घाबरलेल्या या दाम्पत्याने पिशवीतील काही छोट्या पिशव्या तपासून सोन्याचे दागिने बाहेर काढले आणि आफरीनला तिचे दागिने मिळाल्याने तिने पट्टेपूर यांचे आभार मानले. यावेळी बोलताना पट्टेपुर म्हणाले की, बसमधील प्रवाशाने सोडलेली बॅग इतर प्रवाशांच्या हातात सापडली असती तर ती वारसांना परत मिळण्याची शक्यता कमी आहे. मला ती बॅग मिळाल्यापासून, मी ती कोणी मागायला आल्यास परत करायचं ठरवलं. त्यानुसार लाखो रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हरवलेल्यांनाती बॅग परत केल्याचे मला समाधान आहे, असे ते म्हणाले.
दागिने परत मिळाल्याने आफरीनने आनंद व्यक्त करत घरी लग्न असल्याने लग्नात घालण्यासाठी सोन्याचे दागिने घेऊन जात असल्याचे सांगितले. मी माझी बॅग विसरले आणि बसमधून खाली उतरले .लक्षात आले तेव्हा बस निघून गेली होती. मी माझ्या पतीमार्फत बस स्थानक आणि बस युनिटशी त्वरित संपर्क साधला आणि येथे धाव घेतली. अण्णांचे आभारी राहीन असे कंडक्टरला सांगितले . यावेळी युनिटचे सहाय्यक नियंत्रक विठ्ठल लमाणी, परिवहन कर्मचारी संघटनेचे नेते यमनप्पा हंगरगी, मेहबूब नायकोडी, युनिटचे सुरक्षा रक्षक, परिवहन कर्मचारी उपस्थित होते व त्यांनी कंडक्टर पट्टेपुर यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.


Recent Comments