Belagavi

बेळगाव शहराच्या सौंदर्यीकरणाचा आ.अभय पाटील यांना ध्यास : झाडांवरील चित्रांद्वारे देणार सामाजिक संदेश

Share

विकासकामात नेहमीच अग्रेसर असलेले बेळगाव दक्षिणचे आ . अभय पाटील यांनी आता आपल्या मतदारसंघाच्या सौंदर्यीकरणासाठी नवा उपक्रम सुरू केला आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या जवळपास 2700 झाडांच्या खोडांवर चित्रे रंगवून सामाजिक तसेच प्रबोधनात्मक संदेश देणार आहेत .

बेळगाव दक्षिणचे आ . अभय पाटील यांनी आज गुरुवारी , काँग्रेस रोडपासून या उपक्रमाला सुरुवात केली . यावेळी माध्यमांना माहिती देताना त्यांनी सांगितले कि , बेळगाव दक्षिण मतदार संघातील रस्त्यांच्या कडेला सुमारे 2700 झाडे आहेत . आम्ही या झाडांवर , रासायनिक विरहित रंगांचा वापर करून , मुलांसाठी असणारे कार्टून्स , त्याचप्रमाणे अनेक विषयांवर सामाजिक संदेश देणार आहोत . आजपासून या कामाला सुरुवात केली आहे . पाणी वाचवा , तसेच पर्यावरण वाचावा , स्वच्छतेविषयी संदेश आम्ही या चित्रांमार्फत आम्ही देणार आहोत . फेब्रुवारीच्या आत हे सर्व काम पूर्ण होईल आणि बेळगावच्या सौंदर्यात आणखी भर पडेल असे ते म्हणाले .

एकंदरीत आपल्या मतदार संघातील रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडांच्या खोडांवर चित्रांद्वारे सामाजिक आणि प्रबोधनात्मक संदेश देण्याचा हा आ . अभय पाटील यांचा हा उपक्रम अनोखा आहे .

Tags: