काँग्रेसच्या घराला दरवाजेही नाहीत अन खिडक्याही, ते उघडेच आहे, असा पलटवार मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला
भाजपच्या घराला तीन दरवाजे असतात या आमदार प्रियांक खर्गे यांच्या विधानाला ते उत्तर देत होते. कोप्पळच्या जिनिगेरा विमानतळावर आज गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना बोम्मई म्हणाले, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा हे आमचे सर्वोच्च नेते आहेत. त्यांना समोर ठेवून आम्ही सर्व कार्यक्रम करत आहोत. त्यांचे आशीर्वाद आम्हाला आहेत. ते म्हणाले की भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या कार्यक्रमाला तेसुद्धा आधीच पोहोचले आहेत.
बोम्मई आणि येडियुरप्पा यांच्यात मतभेद असल्याच्या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना, बोम्मई म्हणाले, आमचे पिता-पुत्राचे नाते आहे. ते कोणत्याही कारणास्तव कोणत्याही परिस्थितीत अडचणीत येणार नाही. तशी अपेक्षा करणाऱ्यांची निराशा होईल, असे ते म्हणाले.
येडियुरप्पा यांना निमंत्रण दिले नसल्याने ते नाराज असल्याची अफवा ही निव्वळ खोटी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.


Recent Comments