Belagavi

बस चालकाने विद्यार्थिनींना उतरवले बारसमोर

Share

बेळगाव तालुक्यातील सुळगा शाळेचे विद्यार्थी कुद्रेमनी मार्गे येणाऱ्या परिवहन बसमध्ये प्रवास करत असताना योग्य बस थांब्यावर न थांबवल्याने ग्रामस्थांनी बसचालक व वाहकाविरुद्ध संताप व्यक्त केल्याची घटना घडली.

नेहमीप्रमाणे शालेय विद्यार्थी शाळेत जाऊन परतत असताना , परिवहन बसमधून , 16 विद्यार्थिनीना सुळगा येथे न उतरवता एका बारसमोर त्यांना उतरवण्यात आले . त्याचप्रमाणे ह्या बस मधून प्रवास करू नये अशी ताकीद त्या विदयार्थींनीना देण्यात आली . त्याचप्रमाणे चालक आणि वाहकाने विद्यार्थिनींना शिवीगाळ केली. त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांनी अश्रू ढाळत गावकऱ्यांना या प्रकरणाची माहिती देताच, ग्रामस्थांनी ही बस अडवून चालक आणि वाहक या दोघांनाही चांगलेच धारेवर धरले.

कुद्रेमनी बस येताच हे विद्यार्थी बसमध्ये चढले तर , आम्ही बस स्टॉपवर थांबत नाही असे सांगून अपशब्द बोलून शिवीगाळ करतात आणि त्रास देतात. आमच्या गावात योग्य बस व्यवस्था नाही. जिल्हाधिकार्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन दोषी चालक व वाहक कारवाई करून आमच्या भागासाठी परिवहन बसची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे.

Tags: