विविध मागण्यांच्या पूर्ततेच्या मागणीसाठी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी विजापूर शहरात , जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.
विविध मागण्यांच्या पूर्ततेच्या मागणीसाठी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी विजापूर शहरात , जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली . राणी चन्नम्मा विद्यापीठाने शैक्षणिक समस्या सोडवाव्यात. पदवी परीक्षेचा निकाल नियोजित वेळेत जाहीर करावा. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम वारंवार बदलू नये, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे पदवीपूर्व आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची फी कमी करण्यात यावी, प्रश्नपत्रिका इंग्रजी आणि कन्नडमध्ये छापण्यात यावी, या मागणीचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला दिले.

यावेळी राणी चन्नम्मा विद्यापीठाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .


Recent Comments