आपण बसवण्णा यांच्या तत्वांशी कटिबद्ध असून सर्व जातींच्या उत्कर्षासाठी परिश्रम घेत आहोत असे आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.

बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील सांबरा गावात हळदी-कुंकू कार्यक्रम पार पडला. त्याचे उदघाटन करून आ. लक्ष्मी हेब्बाळकर बोलत होत्या. त्या म्हणाल्या, आमदार झाल्यापासून मी सर्व घटकांना विश्वासात घेऊन हजारो कोटींचे अनुदान आणून प्रत्येक गावात विकासाचा धडाका सुरु केला आहे. कसलाही भेदभाव न करता सर्वांच्या उत्कर्षासाठी प्रयत्न केले आहेत. स्थानिक महिलांकडून हळदीकुंकू घेणे आणि भारतीयांच्या महान वारशाचे दर्शन घडवणाऱ्या आणि ऋणानुबंध निर्माण करणाऱ्या हळद कुंकू कार्यक्रमात सहभागी होणे हे आपले भाग्य असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी गावातील नागरिकांतर्फे आ. हेब्बाळकर आणि विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांचा भव्य तिरंगी पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी माजी जिपं सदस्य नागेश देसाई, इराप्पा सुळेभावी, सदाशिव पाटील, श्वेता बोम्मनवाडी, धनश्री चौगुले, पद्मश्री पुजेरी, आशा मोरे, शांता देसाई, सुलोचना जोगाणी, शकीला बागेवाडी, महेंद्र, भावकाण्णा बसरीकट्टी, महेश कुलकर्णी, रफिक अत्तार, वासुदेव पाटील, एकनाथ सनदी, लक्ष्मण सुळेभावी यांच्यासह गावातील महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments