विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील नलतवाड येथे खुल्या विहिरीत मोठ्या मगरीचा वावर आढळून आल्याने लोकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
नलतवाड शहरामधील चिनीवाल येथील एका मोकळ्या जागेत असलेल्या एका खुल्या विहिरीत एक मोठी मगर दिसली आहे. या विहिरीत मगरिचे अनेक दिवसांपासून वास्तव्य आहे. या मगरीच्या बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाला अनेकदा सांगूनही काहीच उपयोग झाला नसल्याचा संताप जनतेने व्यक्त केला आहे. मगरीकडून कोणाला अपाय होण्याआधी तिला येथून अन्यत्र स्थलांतरित करावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.


Recent Comments