Belagavi

धर्मस्थळ ग्रामविकास संस्थेचे वात्सल्य :वृद्ध दाम्पत्याला दिले घर बांधून

Share

बेळगाव तालुक्यातील सुळेभावी येथील गंगाव्वा व लक्ष्मण भजंत्री या वृद्ध दाम्पत्याला श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्रामविकास प्रकल्पांतर्गत घर बांधून मदतीचा हात देण्यात आला आहे.

धर्मस्थळ ग्रामविकास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वात्सल्य योजनेंतर्गत एक लाख रुपये खर्चून शौचालयासह सुसज्ज लाकडी शेड घर तयार केले आहे. मंगळवारी नवीन घराचे उद्घाटन करून , प्रादेशिक संचालक दुग्गेगौडा, जिल्हा संचालक प्रदीप जी. यांनी वृद्ध महिलेला , घर स्वाधीन केले.

यावेळी डॉ.दुग्गेगौडा यांची भाषणे झाली. वीरेंद्र हेग्गडे दाम्पत्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे घर सुपूर्द केले . समाजाच्या तळागाळातील लोकांसाठी कमी किमतीत चांगली घरे उपलब्ध करून देण्याचे आमचे ध्येय आहे . जेणेकरून ते आयुष्यभर आरामात राहू शकतील. 100 घरे बांधण्याची मागणी यापूर्वीच करण्यात आली आहे. आम्ही टप्प्याटप्प्याने घर बांधून देऊ असे त्यांनी सांगितले .

चन्नवृषबेंद्र आश्रमाचे शिव पंचाक्षरी स्वामीजी, खासबाग नियोजक मंजुनाथ एन.आर., मुख्य समन्वयक गीता एस., शाकंबरी मंदिराचे विश्वस्त शंकर इंगळे, पुजारी कलमेश पुजारी, उदय वठारी, गीता अंगोज , संघाच्या अध्यक्षा गंगुबाई जगताप ज्ञानविकास अधिकारी आणि वनविभागाचे सहसंयोजक यावेळी उपस्थित होते .

Tags:

home-built-for-old-aged-couples-from-shri-dharmasthal-scheme/