Vijayapura

बेंगळूर येथे 18 डिसेंबर रोजी भाजपचे शक्तीसंगम संमेलन

Share

राज्य भाजपच्या 24 शाखांचे राज्यस्तरीय संमेलन “शक्तिसंगम” 18 डिसेंबर रोजी बेंगळूर येथील राजवाडा मैदानावरील गायत्री विहार येथे होणार आहे अशी माहिती सहसंचालक जयतीर्थ कट्टी यांनी दिली.

विजापूर शहरात आज मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना जयतीर्थ कट्टी म्हणाले की, जिल्हा व राज्य समितीचे निमंत्रक, सहसंयोजक, जिल्हा समन्वयक आणि समाजाचे नेते यात सहभागी होणार आहेत. 16 हजार ते 18 हजार लोकांना आमंत्रित केले असून, 15 ते 16 हजार लोक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. शक्तीसंगममध्ये मुख्य कार्यकर्त्यांना आमंत्रित केले असून, त्यांच्याकडून समाजात मिसळून पक्षाला मते मिळवून देणे अपेक्षित आहे. 2023 च्या निवडणुकीत, “आमचा बूथ हाच आमचा अभिमान असेल” अशी प्रतिज्ञा करून 50 टक्क्यांहून अधिक मताधिक्याने विजय मिळवण्यासाठी काम करणार असल्याची प्रतिज्ञा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपमध्ये 24 वेगवेगळ्या शाखा असून सर्व शाखा मिळून 50 हजारांहून अधिक सदस्य आहेत.

सर्वांचा समावेश व्हावा या उद्देशाने शक्ती संगम या नावाने हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा सहभागी होणार आहेत. बी.एल. संतोष हे समारोपाचे भाषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.  एकंदर, शक्तीसंगमसारख्या संमेलनाच्या माध्यमातून भाजपने आगामी निवडणुकीसाठी कंबर काल्याचे दिसून येते.

Tags: