महाराष्ट्राचे राष्ट्रवादीचे आ . रोहित पवार यांनी बेळगावला धावती भेट देऊन , मराठी नेत्यांची भेट घेऊन सीमावासियांच्या भावना जाणून घेतल्या .
राष्ट्रवादीचे आ . रोहित पवार यांनी मंगळवारी बेळगावला भेट दिली आणि शहरातील विविध भागात जाऊन मराठी बांधवांच्या समस्या ऐकून घेतल्या त्यानंतर त्यांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या घरी जाऊन चर्चा केली.
त्यापूर्वी त्यांनी हुतात्मा स्मारकाला भेट देऊन , एमईएसच्या नेत्यांसह हुतात्म्यांना अभिवादन केले . नंतर येळ्ळूर येथे डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला तसेच शिवाजी उद्यानात येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.

ते म्हणाले, बेळगाव आणि माझे अतूट नाते आहे. मी लहानपणापासून बेळगावला येतो . आमचे नातेवाईक इथे आहेत . इथल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या अस्मितेसाठी जो लढा लढला तो लढा सोपा नवहता . अनेकांनी यासाठी त्याग केला आहे . ज्यांनी जो लढा आणि त्याग केला आहे तो व्यर्थ जाता कामा नये . ही सर्वांची अस्मितेची लढाई आहे . या माणसांबरोबर एका कुटुंबाप्रमाणे राहण्याची जबाबदारी महाराष्ट्रातील प्रत्येकाची आहे .
यावेळी माजी आ . मनोहर किणेकर , आर आय पाटील , प्रकाश मरगाळे , येळ्ळूर ग्राम पंचायतीतचे अध्यक्ष सतीश पाटील , श्रीराम सेना हिंदुस्तान चे संस्थापक अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर आणि समितीचे नेते उपस्थित होते .


Recent Comments