Belagavi

बेळगाव उत्तर मतदार संघातील बांधकाम कामगारांना कामगार किट्सचे वितरण

Share

कर्नाटक इमारत कामगार व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे देण्यात आलेल्या कामगार किटचे वाटप आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले.

आज महांतेश नगर येथील महंत भवनाजवळ विविध बांधकाम कामगार जसे की पेंटर, प्लंबर, गवंडी , इलेकट्रीशियन आदींना किटचे वाटप करण्यात आले.यावेळी आमदार अनिल बेनके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आज 800 , नूतनीकरण केलेल्या कामगार कार्डधारकांनाच किटचे वाटप करण्यात आले आहे . कामगार मंत्री शिवराम हेब्बार यांना आणखी किट मंजूर करण्याची विनंती आधीच करण्यात आली आहे. आणखी ५ हजार किट येत असून, किट येताच त्याचे वाटप करू, असे त्यांनी सांगितले.

त्यानंतर बोलताना कामगार विभागाचे उपायुक्त व्यंकटेश शिंधीहट्टी म्हणाले की, आम्ही जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर टप्याटप्यात किटचे वाटप करत आहोत. सध्या आमच्याकडे 700 ते 800 किटस आली आहेत . बेळगाव उत्तर मतदार संघातील बांधकाम कामगारांना आ . अनिल बेनके यांच्या हस्ते ही किट्स वितरित करीत आहोत . एका किटची किंमत बाजारात सुमारे 8 हजार पर्यंत आहे . आम्ही ही किट्स कामगारांना मोफत देत आहोत त्यामुळे कामगारांनी किटचा योग्य वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी बेळगाव उत्तर मतदार संघातील बांधकाम कामगार किट घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Tags: