Belagavi

घरकामगार हक्क संघटनेची वार्षिक बैठक

Share

बेळगाव शहरात आज घरकामगार हक्क संघटनेची वार्षिक बैठक पार पडली.या बैठकीत कामगार संघटना ज्या समस्यांसाठी झटत आहे त्यावर चर्चा करण्यात आली.

घरकामगारांच्या हक्कासाठी लढा देणारी कायदेशीर संघटना डोमेस्टिक वर्कर्स राईट्स युनियनतर्फे आज शहरात वार्षिक सभा घेण्यात आली.या सभेत सामाजिक कार्यकर्त्या लता लोबो, शोभा किनगी यांनी सहभाग घेतला.शेकडो महिला घर कामगारांनी सहभाग घेऊन त्यांच्या हक्कांबद्दल माहिती घेतली. .संघाच्या अधिकार्यांनी शासनाकडून मिळणाऱ्या सुविधांची माहिती दिली.

वैशाली कम्मार , गीता मेनन आदी या वेळी उपस्थित होते.

Tags: