Belagavi

मुख्यमंत्र्यानी सर्व पक्ष, कन्नड समर्थक संघटनांची बैठक बोलवण्याची मागणी

Share

कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वादासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 14 डिसेंबर रोजी बोलावलेल्या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यापूर्वी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सर्व पक्ष आणि कन्नड समर्थक संघटनांची बैठक बोलावून या विषयावर चर्चा करावी अशी मागणी बेळगाव जिल्हा कन्नड संघटनांच्या कृती समितीचे अध्यक्ष अशोक चंदरगी यांनी मागणी केली.

बेळगावातील वडगाव येथे डॉ. राजकुमार अभिमानी संघटनेने आयोजित केलेल्या कन्नड समर्थक संघटनांच्या बैठकीत बोलताना अशोक चंदरगी यांनी, बोम्मई यांनी महाजन अहवालाच्या आणि राज्य विधानसभेने पारित केलेल्या ठरावाच्या चौकटीत राहून चर्चा करावी, अशी मागणी केली. महाराष्ट्र सरकार आणि सर्व पक्षांचे नेते सीमावाद कायम ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्राचे आमदार, खासदार, मंत्री एकाच आवाजात बोलत असताना आपल्या राज्यातील लोकप्रतिनिधी गप्प बसतात हे योग्य नाही, असेही ते म्हणाले.

रमेश सोनटक्की, शंकर हुलमणी, विनय ढवळी, शंकर बागेवाडी, राजू कपाली, अरुण सळवडगी आदी कन्नड आंदोलकांनी विचार मांडले. नगरसेविका लक्ष्मी लोकरी अध्यक्षस्थानी होत्या. १९ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधान मंडळाच्या अधिवेशनावेळी महामेळावा घेण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीला परवानगी देऊ नये, अशी विनंती करणारा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला. डॉ. राजकुमार फॅन असोसिएशनचे अध्यक्ष मल्लप्पा अक्षरद यांनी स्वागत व प्रास्ताविक करून आभार मानले.

Tags:

border-row-cm-bommai-should-call-all-party-meet-and-all-kannada-organisation/