Vijayapura

विजापुरात रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा !

Share

प्रवाशाने ऑटोरिक्षात विसरलेले पैसे आणि पर्स रिक्षाचालकाने प्रामाणिकपणे पोलिसांच्या हवाली केल्याची मानवतावादाची घटना रविवारी विजापूर शहरातील गांधीचौक येथे घडली.

हाजी मलंग असे या प्रामाणिक ऑटो चालकाचे नाव आहे. एका प्रवासी महिलेने विसरून तिची पर्स ऑटोमध्ये सोडली होती. त्यात 1800 पेक्षा जास्त रोख रक्कम होती. ती महिला रिक्षातून उतरून गेल्यानंतर चालक हाजी मलंग यांच्या निदर्शनास ही बाब आली.

त्यानंतर त्यांनी तातडीने रोख रकमेसहित पर्स वाहतूक पोलिस ठाण्याचे एएसआय आर. एच. केशवापूर यांच्याकडे नेऊन दिली. दरम्यान, ज्यांची पर्स आहे या संबंधितांनी वाहतूक स्थानकात येऊन घेऊन जाण्याचे आवाहन विजापूर वाहतूक पोलिसांनी केले आहे.
विजापूर वाहतूक पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

Tags: