Belagavi

पंचमसाली समाजाला २ ए आरक्षण जाहीर न केल्यास 22 डिसेंबरला तीव्र आंदोलन

Share

सरकारने 19 डिसेंबरपर्यंत पंचमसाली समाजाला २ ए आरक्षण जाहीर न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे .

याबाबत उद्या 12 डिसेंबरला बेळगाव शहरातील गांधी भवन येथे बैठक महत्त्वाची बैठक होणार आहेकुडलसंगम पंचमसाली पीठाचे पहिले जगद्गुरू बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांच्या नेतृत्वात या सभेचे नेतृत्व करण्यात येणार आहे . या बैठकीला आमदार बसवनगौडा पाटील, माजी आमदार विजयानंद काशप्पनवर, माजी मंत्री विनय कुलकर्णी यांच्यासह भाजप आणि काँग्रेसचे नेते सहभागी होणार आहे . सरकारने आरक्षण न दिल्यास पुढील आंदोलनाबाबत बैठकीत चर्चा करण्यात येणार आहेया बैठकीत 22 डिसेंबरला तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात येईल . बेळगावच्या सुवर्ण विधान सौधाजवळ १०० एकर परिसरात हे आंदोलन करण्यात येणार आहे.
पंचमसाली समाजाच्या 25 लाख लोकांसह आंदोलन करण्यात येणार आहे .

Tags: