बेळगाव येथील गोगटे कॉलेज मधील प्रकरणासंबंधित संपतकुमार देसाई या विद्यार्थ्यांच्या पालकांनी , राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण सूद याना आपल्या मुलाला बेळगाव पोलिसांनी मारहाण केल्याची तक्रार केली तसेच मुलाचे बेळगाव पोलिसांपासून संरक्षण करावे अशा आशयाचे निवेदन देण्यात आले .
बेंगळूर येथे पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांच्या कार्यालयाला भेट देऊन , संपतकुमारला मारहाण करणाऱ्या दोषी पोलीस अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी यावेळी संपतकुमारच्या आईवडिलांनी निवेदनाद्वारे त्यांना केली . या निवेदनाला प्रतिसाद देताना पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांनी आगामी काळात जर काही समस्या उद्भवली तर माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे त्यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यामार्फत संपतकुमारच्या पालकांना सूचित केले आहे .


Recent Comments