ऊस उत्पादकांना रास्त भाव देण्यासह विविध मागण्यांसाठी कर्नाटक शेतकरी कामगार व महिला संघटनेतर्फे अधिवेशनादरम्यान निषेध रॅली काढण्यात येणार आहे .
शनिवारी याकर्नाटक शेतकरी कामगार व महिला संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा जयश्री गुरन्नवर यांनी या विषयावर माहिती देताना सांगितले की, अधिवेशनादरम्यान २६ डिसेंबर रोजी अलारवाड ते सुवर्ण सौध असा निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.
ऊस उत्पादकांना गुजरात-पंजाब मॉडेलनुसार रास्त भाव द्यावा, सहकार क्षेत्रात शासनाने व्यवस्थापकीय संचालकाची नियुक्ती करावी, जंगल अतिक्रमण व नरेगाचे प्रश्न सोडवावेत या मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी या संघटनेचे सदस्य उपस्थित होते .


Recent Comments