Belagavi

जागतिक प्रदूषण नियंत्रण दिनानिमित्त मोफत एमिशन टेस्टिंग शिबीर

Share

लायन्स क्लब इंटरनॅशन मिडटाऊन बेळगावच्या वतीने , विविध वाहनांच्या वाहन चालकांमध्ये जागृती तसेच , ऑटो रिक्षा चालकांसाठी मोफत एमिशन तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.

शनिवारी , लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशन मिडटाऊन बेळगावच्या वतीने , जागतिक प्रदूषण नियंत्रण दिनानिमित्त , शहरातील ऑटो नगरातील ,आरटीओ कार्यालयाजवळ , ऑटो रिक्षा चालकांसाठी मोफत एमिशन तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते . विविध प्रकारच्या वाहनाच्या चालकांमध्ये जागृती करण्याचा या शिबिराचा उद्देश होता .

या शिबिरासंदर्भात माहिती देताना , लायन्स क्लब इंटरनॅशन मिडटाऊन बेळगावचे प्रेसिडेंट शंकर मोरे तसेच ऍड . दिनेश पाटील या पदाधिकाऱ्यांनी सांगितले कि , प्रदूषण नियंत्रण दिनानिमित्त आम्ही हे शिबीर आयोजित केले आहे . कर्नाटक सरकार सार्वजनिक वाहतूक विभागाने प्रदूषणाचा मुद्दा गांभीर्याने घेतला आहे . बेळगाव हे प्रदूषण विरहित तसेच हिरवाईचे शहर आहे . प्रदूषणामुळे शहराचे स्वास्थ बिघडू नये या साठी आम्ही आज इथल्या सर्व वाहन चालकांमध्ये जागृती करीत आहोत . त्याचप्रमाणे पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी ऑटो रिक्षा चालकांसाठी मोफत एमिशन तपासणी शिबीर आयोजित केली आहे याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले .

शहरातील अनेक ऑटो चालकांनी या शिबिराचा लाभ घेतला .

Tags: