रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या वतीने , कॅन्सर जागृती आणि तपासणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
बेळगावमधील , वंटमुरी आरोग्य केंद्रामध्ये शुक्रवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉ . तुक्कार यांनी सांगितले कि आजच्या प्रदूषण आणि तणावपूर्ण जीवनामुळे , त्याचप्रमाणे आनुवंशिकतेमुळे देखी कर्करोग होऊ शकतो . स्त्रियांमध्ये देखील या आजाराचे प्रमाण जास्त आहे . प्राथमिक लक्षणे जरी साधारण दिसत असल्याने याकडे दुर्लक्ष केले जाते . परिणामी , याचे कॅन्सरसारख्या भयंकर आजारात रूपांतर होते . त्यामुळे ह्या आजाराचे निदान होताच योग्य उपचार केल्यास हा आजार बरा होऊ शकतो .स्त्रियांनी याकडे दुर्लक्ष न करता आजाराची लक्षणे दिसू लागताच तज्ञ् डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेळीच उपचार करावेत . यामुळे १००% हा आजार बरा होतो.

यावेळी रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या प्रेसिडेंट आशा पाटील , सेक्रेटरी स्फूर्ती एम , ज्योती कुलकर्णी तसेच अन्य महिला पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होत्या .


Recent Comments