दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता बेळगावकरांसाठी रोटरी अन्नोत्सव सुरु होणार आहे . 6 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान , सावगाव रोड , अंगडी कॉलेजसमोरील खुल्या भव्य जागेत आयोजित केल्या जाणाऱ्या या रोटरी अन्नोत्सवाची , आज मुहूर्तमेढ रोवण्यात आली .
दरवर्षी रोटरी क्लब बेळगाव यांच्या वतीने अन्नोत्सवाचे आयोजन केले जाते . मात्र कोरोनामुळे मागील दोन वर्षे अन्नोत्सव घेता आला नाही . मात्र यंदा अन्नोत्सवाचे मोठया प्रमाणावर आणि नव्या जागेवर आयोजन केले जात आहे .

शुक्रवारी , रोटरी अन्नोत्सवाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली . पुरोहितांचे मंत्रपठण आणि शंखनाद करून मुहूर्तमेढीची पूजा आरती करण्यात आली . या रोटरी अन्नोत्सवाबद्दल माहिती देताना रोटरी चे प्रेसिडेंट बसवराज विभूती यांनी सांगितले , 2 वर्षानंतर , तुमच्यासाठी अन्नोत्सव घेऊन येत आहोत . 1997 सालापासून आम्ही हा अन्नोत्सव आयोजित करीत आहोत . यंदा खूप मोठ्या जागेवर आणि मोठया प्रमाणावर आयोजन करीत आहोत .
यंदाचे अन्नोत्सवाचे हे पंचविसावे वर्ष आहे . पंजाब , हरियाणा , राजस्थान , मंगळूर , हिमाचल प्रदेश , आदी ठिकाणाहून स्टॉल्स येणार आहेत . त्याचप्रमाणे अम्युझमेंट पार्क , आणि रोज नवनवीन मनोरंजाचे कार्यक्रम सादर केले जाणार आहेत . बेळगावकरांनी , या अन्नोत्सवाला आपला प्रतिसाद देऊन, याचा आनंद घ्या असे आवाहन त्यांनी केले .
त्याचप्रमाणे रोटरीचे चेअरमन पराग भंडारी यांनी सांगितले कि ,नानावाडी येथील , अंगडी कॉलेजसमोरील मैदानावर , 6 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान , आम्ही अन्नोत्सवाचे आयोजन करीत आहोत . यंदा किमान 2 लाख लोक भेट देतील अशी अपेक्षा आहे . अम्युझमेंट पार्कसहित 10 दिवस मनोरंजाचे कार्यक्रम सादर होणार आहेत . यंदा 220 स्टॉल्स असून त्यापैकी 160 फूड स्टॉल्स असून, 50 ते 60 कंझ्युमर्स स्टॉल्स आहेत . खवय्यांसाठी काश्मिरी , पंजाबी , राजस्थानी , गुजराथ , केरळ , मंगळूर , महाराष्ट्र सहित दक्षिण भारतीय आणि उत्तर भारतीय खाद्यपदार्थांची रेलचेल असणार आहे . याचा सर्वानी लाभ घ्यावा .

अम्युझमेंट पार्कमध्ये ,मुलांसाठी नवनवीन खेळ आणणार आहोत . त्याचप्रमाणे दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची देखील उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे . शिवाय या ठिकाणाला येण्यासाठी , बेळगाव रेल्वे स्थानकापासून,विशेष बस व्यवस्थादेखील करण्यात आली आहे . सेलिब्रेटी सिंगर्स , मुव्ही , प्रॉडक्ट त्याचप्रमाणे कारचेही लाँचिंग केले जाणार आहे . त्याचप्रमाणे कन्नड सेलिब्रेटी तसेच मुंबईहून देखील सेलिब्रेटी येणार आहेत . बेळगावकरांनी मोठ्या संख्येने येऊन या अन्नोत्सवाचा आणि मनोरंजाचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी रोटरीचे चेअरमन , योगेश कुलकर्णी , जयदीप सिद्धण्णावर , मुकुंद बंग , नितीन गुजर , संदीप नाईक ,मनोज हुईलगोल , बकुळ जोशी आदी उपस्थित होते


Recent Comments