Belagavi

बेकायदा धंदे भोवले ! मटकाकिंग शफीसह बेळगावातून 5 जण तडीपार

Share

मटकाकिंग शफीसह बेकायदा कृत्यांत गुंतलेल्या 5 जणांच्या तडीपारीचा आदेश बेळगावचे पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी आज बजावला. त्यामुळे गुन्हेगारी वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.

होय, वारंवार बेकायदा कृत्ये केल्याचा ठपका ठेवून मटकाकिंग शफीसह 5 जणांच्या तडीपारीचा आदेश बेळगावचे पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी आज बजावला आहे. मटका, जुगार, बेकायदा गांजा, दारूविक्री अशा गैरधंद्यात गुंतल्यावरून कायदा व सुव्यवस्था विभागाच्या डीसीपींच्या अहवालावरून ही कारवाई करण्यात आली आहे. महंमदशफी मोदीनसाब तहशीलदार, वय ६८, आणि इजाजअहमद महमदसाब नेसरीकर, वय ४८, दोघेही रा. खंजर गल्ली, बेळगाव, जानी जयपाल लोंढे, वय ३६, रा. गॅंगवाडी, बेळगाव, बैरगौडा जोतिबा पाटील, वय ४५, रा. पाटील गल्ली, कणबर्गी, बेळगाव आणि नितीन पांडुरंग पेडणेकर उर्फ पेरणकर, वय ५०, रा. खडेबाजार, शहापूर, बेळगाव अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत. त्यांना बेळ्ळारी, कोप्पळ आणि विजयनगर या जिल्ह्यांत तडीपार करण्यात आले आहे. या सगळ्यांवर मार्केट उपविभागातील मार्केट व माळमारुती पोलीस स्थानकात दोन आणि शहापूर पोलीस स्थानकात एक गुन्हा दाखल आहे.

यापुढे हे बेळगावात आढळल्यास तसेच शहरात कुठेही अवैध धंदे होत असल्याचे आढळल्यास नजीकच्या पोलीस स्थानकात माहिती देण्याचे आवाहन पोलीस आयुक्त बोरलिंगय्या यांनी केले आहे.

Tags: