क्षेत्र शिक्षणाधिकारी प्रभावती पाटील ह्या आपल्या कारने हुक्केरी शहराकडे जात असताना टायरचा स्फोट होऊन गाडी पलटी झाली . सुदैवाने या अपघातात बीईओ बचावले आहेत . तालुक्यातील हुब्बरवाडी गावाजवळील मंगसुळी -लक्ष्मेश्वर राज्य महामार्गावर बुधवारी दुपारी हा अपघक्त घडला . घडला.
बुधवारी दुपारी बीईओ आपल्या गावाहून , हुक्केरी शहराकडे निघाल्या होत्या . गाडी स्वत: बीईओ चालवत होत्या . . गाडीचा पुढचा टायर फुटल्याने गाडी २-३ वेळा पलटी झाली . कारमधील एअरबॅग उघडल्याने बीईओ प्रभावती पाटील यांचा जीव वाचला.
ही बाब कळताच तालुक्यातील शिक्षकांनी घटनास्थळी जाऊन तात्काळ दुसऱ्या वाहनात बसवून शहर सार्वजनिक रुग्णालयात उपचार केले. पुढील उपचारासाठी त्यांना रुग्णवाहिकेतून बेळगाव येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. याप्रकरणी रायबाग पोलिस ठाण्यात प्रकरण दाखल करण्यात आला आहे.
बुधवारी दुपारी बीईओ प्रभावती पाटील ह्या बंगळूरला जाण्याच्या तयारी करीत होत्या . गुरुवारी कार्यालयीन कामासाठी त्यांना बंगळूरला जायचे होते . मात्र त्याआधीच हा अपघात घडला .
Recent Comments